अंतराळात केस कसे धुवायचे, नासाच्या अंतराळवीराने व्हिडिओमध्ये दाखवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अंतराळ जगतही थक्क करणारे आहे. लोकांना अंतराळ आणि तिथल्या प्रवाशांबद्दल बरेच प्रश्न सतावत असतात. लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतात की, अंतराळात प्रवास करणाऱ्यांचे जीवन कसे असेल? सध्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थरने एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती आपले केस कसे धुवत आहे हे दाखवले आहे. यामध्ये अंतराळवीर अंतराळात आपले केस कसे स्वच्छ ठेवतात याबाबत ती सांगताना दिसत आहे. खरं तर, मेगन मॅकआर्थरने व्हिडिओ शेअर करताना लिहिले की,”अंतराळवीर अंतराळात आंघोळ करू शकत नाहीत कारण असे केल्याने पाणी सर्वत्र जाईल, म्हणून आपण स्पेस स्टेशनवर केसं कसे स्वच्छ ठेवतात ते पहा. आपण पृथ्वीवर ज्या साध्या गोष्टी सहजपणे करतो त्या सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात वाटते तितक्या सोप्या नसतात.” या व्हिडिओमध्ये मेगन तिच्या केसांना कंगव्याने व्यवस्थित करतानाही दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना मेगन म्हणते की,” तिला वारंवार विचारले जाते की, अंतराळवीर अंतराळात असताना आपले केस कसे स्वच्छ करतात.” ती म्हणते की,” मी तुम्हाला अंतराळात माझी केसं कसे धुते ते दाखवते.” तिने दोनच दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला आहे. यावर लोकं आपली प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

https://twitter.com/Astro_Megan/status/1432708693267779607?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युझरने ‘शानदार’ असे लिहिले तर दुसऱ्या युझरने लिहिले की,” या व्हिडिओसाठी धन्यवाद.” आणखी एका ट्विटर युझरने लिहिले की,” मला वाटते की जर तुम्ही तुमची केसं पृथ्वीवर शॅम्पूने धुवत असाल, आणि जर तुम्ही तुमची केसं पृथ्वीवर तिकडच्यासारखेच धुवाल, तर तुम्ही खूप पाणी वाचवाल.”

अलीकडेच, अंतराळवीर मेगन मॅकआर्थरने तिचा 50 वा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर साजरा केला. नासाच्या अंतराळवीरांनीही या प्रसंगी आईस्क्रीम पार्टीचे आयोजन केले होते. तिची छाया चित्रेही तिथून प्रसिद्ध झाली. मॅकआर्थर सध्या पृथ्वीपासून 260 मैल अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहे. ती एप्रिलमध्ये कॅम्प 65 अंतर्गत येथे पोहोचली होती.

Leave a Comment