नवी दिल्ली वृत्तसंस्था : ऍलोपॅथी संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने रामदेवबाबा यांच्यावर कोलकाता इथं एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या दरम्यान आता आयएमएचे राष्ट्रीय प्रमुख डॉ जे ए जयलाल यांनी या प्रकरणावर ती प्रतिक्रिया दिली आहे.
जयलाल म्हणाले ,आम्ही रामदेव बाबांच्या विरोधात नाही. बाबा रामदेव यांनी आधुनिक औषधं विरोधात केलेले आपले विधान मागे घ्यावे. त्यांनी असं केल्यास आम्ही पोलिसात त्यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेऊ. आम्ही रामदेव बाबांच्या विरोधात अजिबात नाही मात्र रामदेव बाबांनी केलेले विधान हे कोरोना लसी च्या विरोधात आहे. त्यांचं हे विधान लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकते आणि लोकांना गोंधळून टाकणारे आहे. ते पुढे म्हणाले आम्हाला जास्त भिती आहे की रामदेव बाबांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा थेट परिणाम त्या लोकांवर होणार आहे.
याबरोबरच डॉक्टरांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधान याप्रकरणी आय एम एच या उत्तराखंडमधील शाखेने पतंजलीचे प्रमुखमदेव रामदेव बाबा याना मानहानीची नोटीस पाठवली आहे. असं म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी आपल्या विधानासाठी 15 दिवसाच्या आत माफी मागावी अन्यथा आयएमए त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा करेल. डॉक्टरांच्या संघटनेने अशी मागणी केली आहे की रामदेव बाबा यांनी आपल्या विधानासाठी लिखित स्वरूपात माफी मागावी अन्यथा कायदेशीर पद्धतीने दावा करण्यात येईल.
काय आहे रामदेव बाबांचे वादग्रस्त विधान ?
रामदेवबाबाने व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता.