Tuesday, February 7, 2023

कोरोनाच्या भीतीपोटी हृतिकच्या कुटुंबाची खंडाळ्याकडे धाव

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण पसरलेले आहे. दिवसागणिक या व्हायरसचा संसर्ग वाढतानाच दिसत आहे. जोर काहीसा कमी झालेला असला तरी मृतांची संख्या पाहून कुणालाही धडकी भरेल. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सर्वत्र असे भयावह वातावरण पसरले असता अनेक लोक इतरत्र पलायन करताना दिसत आहेत. सध्या हृतिक रोशनचे कुटुंबही मुंबई सोडून खंडाळा येथील फार्महाऊसवर राहायला गेल्याचे कळतेय. हृतिक मात्र अद्यापही जुहूत त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहतो आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिकचे कुटुंब काही सामानासह खंडाळ्याच्या आलिशान फार्म हाऊसवर शिफ्ट झाले आहे. हृतिकचे वडील म्हणजेच अभिनेता राकेश रोशन फक्त महत्त्वाच्या मीटिंग्स वा महत्त्वाच्या कामासाठीच मुंबईत येतात. ऐरवी त्यांचाही मुक्काम खंडाळा फार्महाऊसवर आहे. त्यांची पत्नी पिंकी रोशनही त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये राहत असल्याचे समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे. यामुळे सावधगिरी म्हणून राकेश रोशन यांनी मुंबईबाहेर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

नुकताच राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी आपल्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा केला होता. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते. राकेश रोशन आणि पिंकी यांचे लग्न १९७० सालामध्ये झाले होते. पिंकी आणि राकेश हे एकमेकांचे बालपणीचे मित्र- मैत्रीण आहेत. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे, अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी पिंकी यांनी पुन्हा एकदा नववधू प्रमाणे नटत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. हातावर मेहंदी, आकर्षक साडी अशा पेहरावात पिंकी रोशन एखाद्या नवराई पिंकी रोशन यांचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते.