भक्ताविना भद्रा मारुती मंदिरात जन्मोत्सव; पोलिसांचा कडक बंदोबस्त

औरंगाबाद | हनुमान जयंतीनिमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी भक्त गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात देखील शांतता दिसून आली. यावेळी केवळ पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  याशिवाय आज सकाळी शहरातील सर्व हनुमान मंदिरात पूजा, आरती करण्यात  आली. कोरोनामुळे शहरातील हनुमान मंदिरे बंद  असल्याने बाहेरूनच भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी बजरंग बली की जय… च्या जयघोष करण्यात आला.

हनुमान जयंतीनिमित्त शहरातील सर्व हनुमान मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते. खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने केवळ पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार देशमुख, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र जोंधळे, पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे, वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि पुजारी यांची उपस्थिती होती. मंदिर परिसरात कुणी गर्दी करू नये यासाठी कडक बंदोबस्त देखील लावण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात शांतता दिसून आली. तसेच शहरातील हनुमान मंदिरात अन्नदान, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून शहरातील हनुमान मंदिरात केवळ पुजारी आणि मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सुपारी हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, रोकडीया हनुमान मंदिरात भक्तांनी बाहेरूनच दर्शन घेऊन हनुमान की जयचा जयघोष केला.

औरंगाबाद शहरातील सर्वात ऐतिहासिक ग्रामदैवत समजले जाणारे सुपारी हनुमान मंदिरात आज सकाळी निलेश पुजारी, शैलेश पूजारी, शैलेश पूजारी, योगेश पुजारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. याशिवाय कोरोना असल्यामुळे मंदिराच्या परिसरात मंदिरात गर्दी करून नका, मास्क लावा नियमांचे पालन करा असे बॅनर लागून भक्तांना आवाहन करण्यात आले.  तसेच कर्णपुरा पंचमुखी हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करून गोविंदा वैष्णव यांच्या उपस्थितीत पंकज वैष्णव, पवन वैष्णव यांच्या हस्ते अभिषेक करून पूजा करण्यात आली. तसेच रोकडीया हनुमान मंदिरातदेखील हनुमान जयंती निमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लघुरुद्राभिषेक करून पूजा करण्यात आली. यावेळी विनोद शेवतेकर, प्रदीप वाघ, दिनेश कुढे, श्रीकांत जोशी यांची उपस्थिती होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने या करिता घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत गत वर्षी प्रमाणेच याही वर्षी आपल्या श्री रोकडिया हनुमान मंदिरात अतिशय साधेपणाने परंतु त्याच उत्साहात सकाळी सहा वाजून दहा मिनीटांनी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय समर्थनगर येथील राम मंदिरात देखील श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करून श्री हनुमानकी जय चा जयघोष केला. यावेळी मृदला देसाई, दिलीप देसाई यांच्या हस्ते जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पद्माकर कुलकर्णी, राहुल पुराणिक यांची उपस्थिती होती.

You might also like