दिवाळीच्या तोंडावर नवरा-बायकोमध्ये भांडण; बायकोला चाकूने भोसकून नवऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिवाळीच्या तोंडावर पती-पत्नीमध्ये वाद शुल्लक कारणावरून वाद झाला. हा शाब्दिक वाद इतका गेला की यामध्ये पतीने रागाच्या भरात पत्नीच्या पोटात चाकू भोकसून स्वतः तळोजा रेल्वे ट्रॅकखाली आत्महत्या केली आहे. पनवेलमधल्या तळोजा इथं हा सर्व प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा फेस 1 मध्ये निलकमल अपार्टमेंटमध्ये अर्चना निर्गुडे आणि पती गणेश दुर्गुडे राहत होते. पण सणासुदीच्या दिवशीच दोघांमध्ये घरगुती कारणामुळे टोकाचा वाद झाला. गंभीर म्हणजे चाकू हल्ला करून पत्नीला ठार करण्याच्या प्रयत्नात अर्चना गंभीर जखमी झाली. सदर घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. तर अर्चना दुर्गुडे यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पत्नीवर वार केल्यानंतर आरोपी पती गणेश याने तळोजा रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नेमका वाद इतक्या टोकाला का गेला? याबाबत तळोजा पोलीस सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुल्लक वादामध्ये ऐवढा मोठा गुन्हा का घडला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी शेजारी आणि प्रत्येक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment