भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केलेल्या मारहाणीनंतर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

इंदूर : वृत्तसंस्था – इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेला शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केली आहे. या सर्व प्रकारानंतर पत्नीने रागाच्या भरात विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे.

ही घटना इंदूर शहरातील द्वारकापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लॉकडाऊनमध्ये राजू राजौरेचं काम सुटलं होतं. त्यानंतर घरातील वातावरण बिघडत जात होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरुन तो पत्नीला मारहाण करीत होता. ऋषी पॅलेस निवारी महिला रानू राजौरेने सांगितलं की, रविवारी रात्री खाण्यावरुन तिचा पती राजूसोबत वाद झाला होता.

पतीने सांगितलं की, भाजीत कोंथिबीर का नाही टाकली? यावर ती म्हणाली की, कोथिंबीर नव्हती. यानंतर राजू संतापला आणि त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. यात ती जबर जखमी झाली. काही वेळानंतर पत्नीने विष खाऊ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जवळच्या लोकांनी तिला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. आरोपी पती महिलेला घर चालविण्यासाठी पैसे देत नव्हता. याशिवाय मुलांची शाळेची फीदेखील भरत नव्हता. तसेच सतत मारहाण करत होता. यानंतर पोलिसांनी पती राजूवर हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

You might also like