पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

घुग्घुस : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काॅलरी परिसरातील शास्त्रीनगर येथील आशिष ओमरीक वर्मा यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

वेकोलिच्या कामगार परिसरातील शास्त्रीनगर या ठिकाणी राहणाऱ्या आशिष ओमरीक शर्मा यांचा प्रेमविवाह सहा वर्षापूर्वी त्याच परिसरातील राजीव रतन चिकित्सालयात साफसफाई करणाऱ्या युवतीसोबत झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. विवाहानंतर आशिष हा व्यसनाच्या आहारी गेला होता. यातूनच तो पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन मारहाण करायचा.

१६ जून रोजी देखील त्यांच्यात वाद झाला होता. मात्र हे सगळं सहन न झाल्याने पत्नीने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर ती आपल्या घरी न जाता आपल्या मैत्रिणीकडे राहत होती. यानंतर रविवारी सकाळी आशिषने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

You might also like