Saturday, January 28, 2023

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करून, पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणी मध्ये घडली आहे. शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या, युवकाने, त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर, स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या दांपत्याला एक ते दीड वर्षाचा मुलगा असून, घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

- Advertisement -

खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या कृष्णा माने या तीस ते पस्तीस वर्षीय युवकाने, पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या, कमल जाधव माने या त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण सुरू झाल. ज्याचा आवाज घराच्या बाहेर पर्यंत येत असल्याची माहिती, प्रत्यक्षदर्शींनी दिली. आणि त्यानंतर हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कृष्णा माने हा व्यवसायाने शेती करत असे, तर त्याची पत्नी पोलीस खात्यामध्ये कार्यरत होती. आज दुपारी काही कामानिमित्त आपल्या मुलाला सोबत घेऊन, ते बाहेर गेले होते. पण त्यानंतर घरी आल्यावर, दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.

दरम्यान सदर प्रकार घडल्यानंतर, याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु प्रकरणावर पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आम्हाला 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा ‘Hello News’