औरंगाबाद | चारित्र्यावर संशय घेत पत्नी ज्योती वय (२५) तिचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी पती रामदास केरुबा साळवे वय (४०) मूळ रा. बाळखेडा ता. कन्नड हल्ली राजीव नगर झोपडपट्टी, औरंगाबाद याला जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
मृत ज्योतीची बहिण आशाबाई दिलीप धनराज यांच्या फिर्यादीवरून रामदास विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सहाय्यक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी खटल्याच्या सुनावणीत पंधरा साक्षीदारांचे जवाब नोंदवले. त्यापैकी ज्योतीचा भाऊ सुनील जगताप व डॉक्टरांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी रामदासला जन्मठेप आणि दंड ठोठावला. कोर्ट पैरवी भरून पोलिस हेडकॉन्स्टेबल उत्तम तायडे यांनी सहकार्य केले कुणाच्या घटनेच्या तीन वर्षापूर्वी ज्योती आणि रामदासचे लग्न झाले होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती मारहाण करीत होता.
पुनर्वसन आणि भरपाईसाठी विधीसेवाकडे वर्ग :
मृताचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीचे पुनर्वसन आणि नुकसानभरपाईसाठी सत्र न्यायालयाने हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 356 नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आकडे पाठवण्याचे आदेशात म्हटले आहे.