पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध; पतीने केला पत्नीचा भांडाफोड

लंडन : वृत्तसंस्था – लंडन शहरात एक हैराण करणारी घटना घडली आहे. या प्रकरणात एका महिलेने आपल्या मैत्रिणीसोबत तसेच तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले हे जेव्हा तिच्या पतीला समजले तेव्हा त्याला धक्काच बसला. या व्यक्तीला आपल्या पत्नीवर तेव्हा संशय आला जेव्हा बाथरूममध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आढळून आले. त्याला प्रश्न पडला की, त्याने नसबंदी केलेली असताना त्याच्या पत्नीला ही टेस्ट कीट वापरण्याची गरज का पडावी?

पत्नीने मान्य केला गुन्हा
पीडित पतीचे वय ४० वर्षे असून पत्नीचे वय ३८ वर्षे आहे. पतीने सांगितले कि त्याचे त्याच्या पत्नीसोबत चांगले संबंध होते. त्याचा तिच्यावर खूप विश्वास होता. पण जेव्हा पत्नीने मान्य केले कि तिने तिच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी त्याला सारखे सांगत होती कि तिला एखाद्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे. पण त्यावेळी पतीला वाटले कि, ही केवळ तिची कल्पना असेल. पण त्याला याची जराही कल्पना नव्हती की, ती याबाबत इतकी पुढे निघून जाईल असे महिलेच्या पतीने सांगितले आहे. तसेच त्याची पत्नी सायकलिंगचे कारण देत बराच वेळ घरातून बाहेर राहत होती आणि यादरम्यानच तिने त्याला दगा दिला. तिने तिच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या पतीसोबत संबंध ठेवले असेदेखील महिलेच्या पतीने सांगितले.

असा झाला भांडाफोड
जेव्हा पीडित पतीने आपल्या पत्नीला विचारले कि तू मला दगा दिलास का? तर पत्नीने तिची चूक मान्य केली. तेव्हा पत्नीने सांगितले कि तिने केवळ तिच्या महिला मैत्रिणीसोबत संबंध ठेवले होते. पण जेव्हा पतीने तिला सगळं खरं सांगण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली की, तिने तिच्या मैत्रिणीच्या पतीसोबतदेखील शारीरिक संबंध ठेवले आहे.यानंतर पतीने सांगितले कि तो आता त्याच्या पत्नीवर कधीच विश्वास ठेवणार नाही.

You might also like