Monday, February 6, 2023

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप

- Advertisement -

औरंगाबाद – पैशांसाठी स्वतःची पत्नी राधाबाई हिला जाळून मारणारा पती सुदाम भालेकर (40, रा. निपाणी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी काल जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे आहेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात फिर्यादीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे विशेष दंडाधिकारी पोलीस डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय पक्षांचा युक्तिवाद व साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली.

काय होते प्रकरण ?
राधाबाई सुदाम भालेकर यांनी फिर्यादी दिली होती की, सुदामा ची जमीन भूसंपादनात गेली होती. म्हणून त्याला 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. त्यापैकी 4 लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी फिर्यादीच्या नावे बँकेत जमा केले होते. आरोपीने 2 लाख रुपये दारू व जुगारात उडवले होते. 6 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपीने फिर्यादीला एक लाख रुपये मागितले. यानंतर पतीने राधाबाईला जाळून टाकले होते. मात्र मुलीने आईच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. उपचार सुरू असताना राधाबाईच्या मृत्यू झाला होता. याबाबत चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

गुन्ह्याचा तपास करून तपास अधिकारी तत्कालिन उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार नईम शेख आणि एलपीसी सी.यु. नगराळे यांनी काम पाहिले.