व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री श्वेता तिवारीवर नवऱ्याचे गंभीर आरोप; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई | सिनेस्टार आणि त्यांचं खासगी आयुष्य हे नेहमी सतत काहीना – काही कारणामुळे चर्चेत राहत असल्याचं आपण आजवर अनुभवत आलोय.असाच प्रकार काहीसा अनुभवायला मिळतो आहे तो “बिग – बॉस” फ्रेम अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बाबतींत.या आधीही श्वेतावर तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनव कोहलीने अनेक आरोप केले होते.

पण नुकताच अभिनव कोहलीने श्र्वेतावर एक गंभीर आरोप केला आहे.त्या आरोपात अभिनव असे म्हणतो की “श्वेता मला माझ्या चार वर्षाच्या मुलाला म्हणजे रेयांशला भेटू देत नाही.तसेच सध्या रेयांश कुठे आहे हे देखील मला माहित नाही.म्हणून मायबाप कोर्टाने मला या प्रकरणी मदत करावी अशी याचिका अभिनव कोहली यांनी अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे.

अभिनव आणि श्वेता यांच्या बाबतीत हा अनुभव आजवर बऱ्याच वेळा आलाय.या आधी देखील २०१९ साली अभिनव यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती त्यांनतर अभिनव पुन्हा डिसेंबर २०२० साली रे प्रकरणी कोर्टात गेले होते आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा प्रकरण कोर्टात गेलं आहे.

दरम्यान हिंदीतील एका नावाजलेल्या दैनिकाने श्वेता तिवारी यांच्या वकीलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.तर अभिनव यांच्या वकील तृप्ती शेट्टी म्हणतात की माझे अशील अभिनव ज्या – ज्या वेळेस रेयांश ला भेटायला जातात.त्या – त्या वेळेला त्यांना वेगळी – वेगळी करणे सांगून त्यांना भेटू दिले जात नाही.आता एका बापाचं हृदय जर मुलाला भेटायला आसुसलेले असेल तर कायद्याने देखील त्यांची साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या प्रकरणात सत्य काय आहे ते समोर येईलच.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.