Wednesday, June 7, 2023

हैदराबाद एन्काऊंटर नंतर ‘या’ सेलिब्रिटींनी केलं तेलंगणा पोलिसांचे कौतुक

टीम, HELLO महाराष्ट्र । हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली.

दरम्यान हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले आणि देशभर याच्या प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या असून बहुतांश बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेलंगणा पोलिसांचे कौतुक करत, शाब्बासकी दिली आहे. जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर, अनुपम खेर यांनी ट्विट करत पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौतची तसेच तिची बहीण रंगोली चंदेल यांनी देखील याला समर्थन दिले आहे. तसेच साऊथ सुपरस्टार नागार्जुन, ज्यू. एनटीआर या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी देखील तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले आहे.