“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात अश्या अनके व्यक्ती आहेत कि , त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामध्ये रतन टाटा , बिल गेटस अश्या अनके दिगजांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याविषयी एक चर्चा सोशल मीडियावर आहे. कि त्यांनी कोरोना विषाणू पसरवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. अमेरिकेमध्ये कॉन्सपिरसी थेअरिस्ट म्हणजेच कट सिद्धांत मांडणाऱ्या काही लोकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन हे आरोप केले आहेत.

जगभरात करोनाचा फैलाव होण्यामागे गेट्स यांचा हात असल्याचा दावा केला जात आहे त्यावर उत्तर देताना म्हणाले कि , “खरं नेहमी जगासमोर येतं यावर माझा विश्वास आहे.” बिल गेट्स गेट्स यांच्यावर आरोप करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गेट्स यांना जगातील १५ टक्के लोकसंख्या संपवायची आहे आणि लोकांमध्ये मायक्रोचीपचा प्रयोग करायाच आहे असा दावा करण्यात आला आहे. युट्यूबवर या व्हिडिओ लाखोंच्या संख्येने लोकांनी पहिला आहे.

बिल गेट्स यांनी या व्हिडीओ मध्ये करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले कि “सोशल मिडिया आणि महामारी हे दोन्ही एकत्र येणं हे एक चुकीचं समीकरण आहे आणि लोकांना अगदी साध्या साध्या गोष्टींचेही स्पष्टीकरण अपेक्षित असतं,करोनाची लस गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आमच्या फाउंडेशनने अधिक निधी दिला आहे.,या सर्व कामाकडे दूर्लक्ष करुन आता लोकांना मारण्याचा आमचा डाव आहे किंवा त्यांना बाधा होईल असं काहीतरी करण्याचा आमचा विचार असल्याचे खोटं सांगितलं जात आहे. किमान आम्ही करोना लसीसाठी काम करतोय हे तरी लक्षात असायला हवं होत. मात्र यासंदर्भातील माहिती उलट सुलटं पद्धतीने माहिती सांगितली जात आहे,” असं गेट्स यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.

बिल गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून करोनाविरुद्धच्या लढाईसाठी २५० मिलियन डॉलरची मदत करण्याचा निर्णय बिल गेट्स यांनी घेतला आहे. मागील २० वर्षांपासून अनेक विकसनशील देशांमध्ये आरोग्यासंदर्भातील कामांसाठी हजारो कोटी रुपये बिल गेट्स यांच्याकडून खर्च करण्यात आला आहे. बिल गेट्स यांच्याविरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर शेअर होणाऱ्या अपप्रचार करणाऱ्या पोस्ट , अनेक दावे ,शेअर माहिती खोटी असल्याचे समोर आली आहे. यामध्ये अगदी अनेक पोस्टमधील माहिती खोटी असल्याचे उघड झाले असून अफवा पसरवण्यासाठी हे केलं जात असल्याचं सत्य समोर आलं आहे. ही खोटी माहिती इंग्रजीबरोबरच फ्रेंच, स्पॅनिश, पॉलिश भाषेमध्येही देण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment