‘ईडी’कडून नोटीस मिळाताचं महाराष्ट्रभरातून मला सहानुभूतीचे फोन येतायत- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी प्रथमच ईडीकडून नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर दौऱ्यावर असताना खडसेंनी ईडीच्या नोटीशीची कबुली दिली. यावेळी मीडियाशी बोलताना, एकनाथ खडसे यांनी ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर आपणास राज्यभरातून सहानुभूती मिळत असल्याचंही म्हणाले.

”शिरपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मला ईडीची नोटीस मिळाली हे खरं असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात फोन कॉल्स येत आहेत. याउलट मला असं जाणवलं की, महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत, त्यांच्याकडून एकप्रकारची सहानुभूतीच व्यक्त करण्यात येत असल्याचं” एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

तसेच, लोकांना असं वाटतंय की, हा एक प्रकारचा अन्यायच आहे. वारंवार चौकशा करत राहणं हे लोकांना आवडलेलं दिसत नाही. परंतु, निर्णय झालेला असतो, त्याला अनुसरुन आपल्याला काम करायचं असतं, असेही खडसेंनी म्हटलं. दरम्यान, ईडीने 30 डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस खडसेंना पाठविली आहे. दरम्यान, आता ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी संस्थेतील 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचारप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असल्याचं सांगितलं होतं. तसेच, संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याचीही माहिती असून ती देणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे आणि पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे‌.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment