पंतप्रधान मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतलाय; नाना पटोलेंनी ठोकला शड्डू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । “या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असं म्हणत काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला आव्हान दिलंय. ते नागपुरात एका सभेत बोलत होते.

यावेळी नाना पटोलेंनी भाजपच्या वेगवेगळ्या धोरणांवर सडकून टीका केली. “भाजपने सुशांतसिंग प्रकरणात राज्य सरकारला तीन महिने बदनाम केलं. यात भाजपचा एक मोठा नेता अडकला आहे,” असा आरोप पटोले यांनी केला. तसेच, भाजपचा नेता अडकल्यामुळेच सीबीआयने अहवाल दाबून ठेवला आहे, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, मनमोहन सरकारच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment