माझं बोलणं झोंबल्यांने खासदारांची सपशेल माघार : आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दिवसभर मिडियातून माझं आणि अजिंक्यतारा कारखान्याचे नाव घेतलं जात होतं, तेव्हा खासदारांनी खुलासा का केला नाही. त्यानंतर मी रात्री बोललो ते बहुतेक जास्त लागलं असेल किंवा झोंबले असेल त्यामुळेच त्यांनी पत्रक काढून सपशेल माघार घेतली, असल्याचा चिमटा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढला.

सातारा पालिका निवडणूक जवळ येताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. उदयनराजेंच्या पत्रकावर आमदार शिवेंद्रराजे यांनी आज प्रतिक्रिया दिली.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ठरल्या प्रमाणे अगोदर बोलायचं आणि नंतर माघार घ्यायची आणि मी बोललोच नाही म्हणायचं. मी स्वतःहून उदयनराजेंना कधी बोललो नाही पण ते जर बोलले तर त्याला उत्तर देणे मला क्रमप्राप्त आहे. उदयनराजेंनी बोलताना विचार करावा.

Leave a Comment