तुझ्या गर्लफ्रेंडसोबर मला सेक्स करायचाय! नाही म्हणताच पोलिसाने बाॅयफ्रेंडसोबतच केलं ते कृत्य; Video केला शूट

इस्लामपूर | महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या गर्लफ्रेंडशी शरीर संबंधास नकार दिल्याचा राग मनात धरून त्या युवकावरच पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर याच्यावर अनैसर्गिक अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. पोलिसाच्या अमानवी कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

याबाबत माहिती अशी, पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेला कर्मचारी २७ ऑक्टोबरला पहाटे ३ वाजता पेट्रोलिंग करीत असताना पिडीत मुलगा हा त्याची मैत्रिनीला भेटून पुन्हा वस्तीगृहात जात होता. आरोपी हणमंत देवकर व एक पोलीस कर्मचारी यांनी त्यास अडवून त्यास “आत्ता कोठून आलास इथे काय करतो” असे विचारले असता पिडीत याने मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास संपूर्ण माहीती मागितली असता पिडीताने सर्व माहीती सांगितल्यावर त्याचा मोबाईल नंबर दिला. २९ ऑक्टोबर रोजी युवकास हणमंत देवकर याने मोबाईलवरून फोन करून “कॉलेजच्या गेटवर भेटायला ये “असे सांगितले. त्यानंतर ११ वाजता युवक हणमंत देवकरला भेटायला गेल्यावर त्यास त्याचे मैत्रिणीच्या प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी करून त्याच्या व मैत्रिणीच्या घरी सांगण्याबाबत धमकावले.

त्यावेळी त्याने घाबरून कॉलेजमधील मित्रांकडून ४ हजार रुपये उसणे घेवून पोलीस हणमंत देवकर यास दिले. परंतु त्याचे समाधान झाले नाही. हणमंत देवकरने पिडीतास “तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे व तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग ” असे सांगितले. त्यावेळी पिडीताने ती मुलगी चांगली असून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी हणमंत देवकरने पिडीतास तुझ्या मैत्रिणीसोबत जर शरीरसंबंध करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत शरीरसंबंध करणार असे म्हणाला. त्यावर पिडीत मुलगा घाबरला. हणमंतने पिडीतास तुझ्या रूमवर चल, तुझ्यासोबत शरीरसंबंध करायाचा आहे. असे सांगितल्यानंतर पिडीताने आपल्या मित्रास दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले.

हणमंत देवकरने पिडीताबरोबर अनैसर्गिक कृत्य करताना व्हिडीओ करून निघून गेला. २१ ऑक्टोबरला दुपारी १२ च्या सुमारास हणमंतने पुन्हा पिडीत मुलास मोबाईलवरुन फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली. मोबाईल मधील अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ दाखविला. तु माझ्यासोबत आला नाहीस तर तुला आता दाखविलेला व्हिडीओ मी व्हायरल करीन अशी धमकी दिली. याबाबतची तक्रार पीडित युवकाने इस्लामपूर पोलीसात दिली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर यास अटक करणेत आली आहे.

You might also like