हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी उद्योगपती एन. आर. नारायण मूर्ती यांनी युवकांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यामुळे नारायण मूर्ती चांगले चर्चेत आले होते तसेच सोशल मीडियावर देखील त्यांना ट्रोल केले गेले होते. आता पुन्हा एकदा नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासात बद्दल एक नवे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हणले आहे की, “मी इन्फोसिसची स्थापना केल्यानंतर कंपनीसाठी आठवड्याला ९० तास काम केले आहे आणि हे काम वाया गेले नाही. १९९४ पर्यंत मी अशाच प्रकारे काम करत होतो”
नुकतीच नारायण मूर्ती यांनी इकॉनॉमिक टाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्येच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आपल्या कामाचा दिनचर्या सांगताना नारायण मूर्ती म्हणाले की, “मी सकाळी ६.२० ला ऑफिसला पोहोचत होतो, त्यानंतर रात्री ८.३० ला मी ऑफीसमधून बाहेर पडत होतो. जे देश आज समृद्ध बनले आहेत, ते कष्टातूनच बनले आहेत. माझ्या पालकांनी मला एकच शिकवलं होतं, गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे अपार कष्ट”
त्याचबरोबर, “मी ४० वर्ष व्यावसायिक जीवनात आहे, माझ्या संपूर्ण कार्यकाळात आठवड्याला ७० तास काम केले आहे. १९९४पर्यंत आमच्या कंपनीत सहा दिवसांचा आठवडा होता, तोपर्यंत मी ८५ ते ९० तास काम करत होतो, आणि ही कष्ट वाया गेले नाहीत” असे देखील नारायण मूर्ती यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नारायण राणे यांनी म्हटले होते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील लोकांनी जास्त काम केले होते. भारतातील तरुणांनीही देशाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर, त्यांनी आठवड्याचे 70 तास काम करायला हवे असा सल्ला दिला होता. ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले.