वायुसेनेचे मिग-२९ विमान कोसळलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय वायुसेनेचे मिग-२९ फायटर विमान शुक्रवारी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळलं. जालंधर एअर फोर्स बेसवरुन नियमित सरावासाठी या फायटर विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं. जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-२९ चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिग-२९ हे रशियन बनावटीचे विमान असून १९९९ साली कारगिल युद्धात शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता. एअरफोर्सकडे ६० पेक्षा जास्त मिग-२९ विमाने आहेत. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. मल्टीरोल म्हणजेच बहुउद्देशीय प्रकारामध्ये ही फायटर विमाने मोडतात. एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड अशा दोन्ही मिशन्ससाठी ही विमाने उपयुक्त आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment