ICICI बँकेचे ग्राहक आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून पैसे काढू शकतील, त्यासाठीची प्रोसेस जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला पैसे काढण्यासाठी ATM कार्ड घेऊन जाणे अवघड वाटत असेल किंवा तुमचे ATM कार्ड घरी विसरले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, ICICI बँक आपल्या ग्राहकांना ATM/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते. बँकेने या सुविधेला Cardless Cash Withdrawal असे नाव दिले आहे.

यासाठी तुमच्या फोनमध्ये ICICI बँकेचे iMobile App असणे आवश्यक आहे. या App द्वारे तुम्ही देशातील 15 हजाराहून जास्त ICICI बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकता. Cardless Cash द्वारे, तुम्ही एका ट्रान्सझॅक्शनमधून 20,000 रुपये आणि ICICI ATM मधून एका दिवसात 20,000 रुपये काढू शकाल.

iMobile App मध्ये सुविधा कुठे उपलब्ध असेल?
iMobile App मध्ये तुम्हाला Services वर क्लिक करावे लागेल, आता Cardless Cash Withdrawal पर्यायावर क्लिक करा. यानंतर At ICICI ATM सिलेक्ट करा. आता Amount आणि 4 अंकी Temporary PIN एंटर करा. यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर SMS द्वारे 6 अंकी कोड मिळेल. हा कोड 6 तासांसाठी व्हॅलिड असेल.

ICICI बँकेच्या ATM मध्ये ही पद्धत फॉलो करा
आता तुम्हाला पहिले ICICI बँकेच्या ATM मध्ये जावे लागेल. जिथे तुम्हाला ‘Cardless Withdrawal’ वर क्लिक करावे लागेल आणि ही माहिती भरावी लागेल.

>> Registered Mobile Number
>> Temporary 4-Digit Code
>> 6-Digit Code
>> Exact withdrawal amount

Leave a Comment