ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank कडून पुन्हा एकदा आपल्या 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, अवघ्या सहा दिवसांपूर्वीच ICICI ने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली होती. आता ICICI बँकेने निवडक मुदतींच्या FD चे दर 5 bps ने वाढवले ​​आहेत. तसेच हे नवीन सुधारित दर 22 जून 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

ICICI Bank revises fixed deposit (FD) interest rates. Latest FD rates here  | Mint

ICICI Bank  ने आपल्या वेबसाइटवरील माहिती सांगितले कि, बँके कडून वेगवेगळ्या मुदतीसाठी ऑफर करण्यात आलेल्या FD चे दर आता 2.75 टक्के ते 5.75 टक्के केले गेले आहेत. ICICI ने आपल्या Term deposits वर185 दिवसांवरून एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या आणि एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंत FD चे व्याज दर वाढवले ​​आहेत.

ICICI Bank hikes interest rates on fixed deposits; Check the latest rates  here | Mint

हे नवीन दर लागू झाल्यानंतर बँकेकडून 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.65 टक्के व्याज दर दिला जात आहे, जो आधी 4.60 टक्के होता. त्याचप्रमाणे,ICICI Bank  1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसह FD वर 5.35 टक्के वार्षिक रिटर्न देत आहे, जो आधी 5.30 टक्के वार्षिक रिटर्न देत होतेया. मात्र इथे हे जाणून घ्या कि, बँकेने आपल्या इतर मुदतीच्या FD व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

185 दिवस ते 1 वर्ष या कालावधीबद्दल बोलायचे सांगायचे झाल्यास बँकेने त्याला चार कालावधीत विभागले आहे. हे कालावधी खालीलप्रमाणे असतील – 185-210 दिवस, 211 – 270 दिवस, 271 – 289 दिवस आणि 290 ते एका वर्षापेक्षा कमी. या सर्व कालावधीसाठी बँकेने 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.  ICICI Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page

हे पण वाचा :

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

Gold Price Today : जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!!

SBI च्या ‘या’ स्कीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा इतके पैसे !!!

Online fraud : बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

Stock Market : टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!