ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या ICICI Bank ने आपल्या FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवीन दर 13 मे पासून लागू होतील. बँक आता 7 ते 29 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 2.75 ऐवजी 3 टक्के व्याज देत आहे. तसेच 30 ते 60 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर याआधी 3 टक्के व्याजदर देण्यात येत होता,जो आता 3.25 टक्के करण्यात आलेला आहे.

ICICI Bank आता 61 ते 90 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 3.25 टक्क्यांऐवजी 3.40 टक्के व्याज देईल. त्याचप्रमाणे, 91 ते 184 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवरवरील व्याजदर पूर्वी 3.5 टक्के होता, जो बँकेने 3.6 टक्के केला आहे. मात्र, 185 ते 270 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवरवरील 3.75 टक्के व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ICICI Bank picks up 800 seats on 2-year lease at co-working site in Mumbai:  Report

तसेच ICICI Bank कडून 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्ससाठी 4 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आलेला आहे. तसेच, 1 वर्षापेक्षा कमी ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवरील व्याज दर 4.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याज दर 4.65 टक्के असेल. 18 महिने ते 2 वर्षांच्या मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 4.7 टक्के असेल.

Missed you credit or debit card delivery? ICICI Bank launches unique  OTP-based self-service delivery facility. Here are the details - The  Statesman

तसेच बँकेच्या 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षे मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याज दर 4.8 टक्क्यांवर वर स्थिर आहे. त्याच वेळी, 3 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरॅट कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तो 4.85 टक्क्यांवर वर स्थिर आहे. ICICI Bank

ICICI Bank introduces 'Insta FlexiCash' for salary account customers

ICICI बँकेच्या FD च्या व्याजदराच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page

हे पण वाचा : 

Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा

FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ

Leave a Comment