गोंदिया पोलिसांनी उधळला नक्षलवाद्यांचा कट; धनेगाव ते मुरकूटडोह रोडवर पेरलेली स्फोटके केली निकामी

गोंदिया । गोंदिया पोलिसांनी धाडसी कामगिरी करुन नक्षलवाद्यांचा कट उधळून लावला आहे. धनेगाव ते मुरकूटडोह या रस्त्यावर पेरून ठेवण्यात आलेली स्फोटके पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया पोलिसांनी निकामी केली. त्यामुळं एका मोठा घातपात घडवून आणण्याच्या नक्षलवाद्यांच्या मनसुब्यांना पोलिसांनी सतर्कतेने उधळून लावले.

मिळलेल्या माहितीनुसार, दलदलकुही स्प्रिंग पॉइंटच्या जवळ बॉम्बशोधक पथकास संशयास्पद वस्तू आढळून आल्याने पोलिसांनी या भागाची व्यवस्थित पाहणी केली असता पोलिसांना मारण्यासाठी याठिकाणी घातक आयइडी स्फोटक पेरुन ठेवल्याचं उघड झालं. हे निकामी केलं असता यातून सिल्व्हर रंगाचा अल्युमिनियम बेस एक्सप्लोसिव्ह, इलेक्ट्रिक डीटोनेटर, जर्मन डब्बा कंटेनर, इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि वायर हे साहित्य आढळून आलं.

हे नक्की कुणाचं काम आहे याची अधिक माहिती घेऊन तपास करण्याचं काम सध्या गोंदिया पोलिसांकडून समोर आलं आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि इतर सहकाऱ्यांनी पार पाडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like