Sunday, March 26, 2023

भाजपला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध हे चुकीचं – भैय्याजी जोशी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भाजपला लक्ष्य केलं जात असून भाजपप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकेची झोड उठवली जात आहे. यावर संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी टिप्पणी केली आहे.गोव्यामधील दोनापावला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने ‘विश्वगुरू भारत-आरएसएसचा दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

“हिंदू समाज म्हणजे भाजपा नाही. त्यामुळे भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे. हिंदू समाज म्हणजे भाजपा नाही. आणि भाजपाला विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाला विरोध करण्यासारखं नाही. राजकीय लढाई सुरुच राहणार असून यास हिंदूशी जोडू नका. असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी केलं आहे.

- Advertisement -

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.