बिबट्या सापडला असता तर 100 टक्के शिवबंधनच : ना. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दौलतनगर येथील कारखाना स्थळावरील निवासस्थानी बिबट्याचे शुक्रवारी दर्शन झाले. घराच्या बागेतून बिबट्या फेरफटका मारुन गेल्याचा सीसीटीव्हीतील व्हिडिअो व्हायरल झाला होता. सुरक्षा रक्षकाने बिबट्याचा पाठलागही केला. जर बिबट्या सापडला असता तर त्याला 100 टक्के शिवबंधन बांधले असते, अशी मिश्किल प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई दौलतानगर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बैठकीत चर्चा करत होते. तेव्हा घराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर मरळी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, सांगवडसह कारखाना परिसरात राहत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शंभूराज देसाई यांना बिबट्या घराजवळ आलेला असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान विचारला असता ते म्हणाले की, वाघाकडेच वाघ येणार भेटायला. यानंतर बिबट्याला शिवबंधन बांधले असते का? असे विचारल्यावर घावला असता तर १०० टक्के शिवबंधन बांधले असते असे शंभराज देसाई यांनी म्हटलं आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई दौलतानगर येथे संध्याकाळी मोजक्याच कार्यकर्त्यासोबत होते. बैठक सुरू असताना घराबाहेर बिबट्या बागेतून फेरफटका मारुन गेला. सुरक्षारक्षकाचे लक्ष गेल्यानंतर बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचा वावर आता घरापर्यंत होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Leave a Comment