परभणी । या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हा सवाल केला.
या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. मुळात हा आरोप राजकीय आहे. भाजपवाले यात विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे. खरे तर सरकार मराठा आरक्षणावर गंभीर असून कामही करत आहे. हा प्रश्न खंडपीठाकडे ठेवून चालणार नाही. तो घटनापीठाकडे असावा, असं आमचं म्हणणं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
US Election:राजकीय वारं बदलणाऱ्या 'त्या' वादळी सभेची पुनरावृत्ती थेट अमेरिकेत; बायडन यांचं भर पावसात जोरदार भाषण
वाचा सविस्तर -👉 https://t.co/gqcjlWmvwD @PawarSpeaks @JoeBiden #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in