इन्कम टॅक्स रिफंडचे पैसे आले नसतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे अशाप्रकारे करा तक्रार

नवी दिल्ली । जर एखाद्या आर्थिक वर्षातील तुमच्या अंदाजे गुंतवणुकीच्या आधारावर ऍडव्हान्स टॅक्सची रक्कम कापली गेली असेल, मात्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम पेपर सबमिट केल्यानंतर, तुमच्या दायित्वानुसार जास्त टॅक्स कट करण्यात आल्याचे आढळून आले तर ते रिफंड केले जाईल. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून ते घेण्यासाठी तुम्हाला ITR रिफंडसाठी अर्ज करावा लागेल.

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्या बहुतेक लोकांचे रिफंड आले आहेत किंवा ते प्रक्रियेत आहेत. जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरला असेल आणि तुमचा रिफंड अजूनही आला नसेल तर तुम्ही ते तपासू शकता. तसेच रिफंड न मिळाल्यास तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे तक्रार करू शकता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टने करदात्यांना रिफंड म्हणून 1.23 लाख कोटी रुपये रिफंड केले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टच्या म्हणण्यानुसार, या रकमेत 2021-22 अंतर्गत 75.75 लाख करदात्यांना दिलेला रिफंड देखील समाविष्ट आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टने 15,998.31 कोटी रुपये रिफंड केले आहेत.

रिफंड कसा तपासावा ?
जर तुम्ही तुमचा ITR वेळेवर भरला असेल तर तुम्ही http://www.incometax.gov.in वर जाऊन रिफंडचे स्टेट्स तपासू शकता. यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड म्हणून पॅन नंबर टाकून तुमच्या खात्यात लॉग-इन करावे लागेल.

तुमचे खाते उघडल्यानंतर, ‘ई-फाइल’ पर्यायावर क्लिक करा आणि ‘ई-फाइल’ पर्यायामध्ये ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ निवडा. येथे तुम्ही ‘View file returns’ या पर्यायावर क्लिक कराल, त्यानंतर तुमच्या रिटर्नचे स्टेट्स तुमच्या समोर दिसेल.

आर्थिक वर्ष 2020-21 साठी दाखल केलेल्या ITR चे मूल्यांकन 2021-22 या वर्षासाठी असेल. येथे तुम्ही डिटेल्स तपासू शकता. येथे तुम्ही टॅक्स रिफंड जारी करण्याची तारीख, रिफंड रक्कम इत्यादी डिटेल्स तपासू शकता.

रिफंडच्या ट्रॅकिंगसाठी, तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टच्या  http://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html. वेबसाइटला भेट देऊन टॅक्सची संपूर्ण माहिती गोळा करू शकता.

या पेजवर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल. खालील कॉलममध्ये मूल्यांकन वर्ष भरा आणि नंतर खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करा. अशा प्रकारे तुम्ही टॅक्स रिफंडचे स्टेट्स तपासू शकता. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर, तुमच्या रिफंडच्या पैशाच्या स्टेट्सवर आधारित एक मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

तुम्ही येथे तक्रार दाखल करू शकता
जर रिफंड तुमच्या बँक खात्यात आला नसेल, तर तुम्ही त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडे तक्रार करू शकता. तुम्ही तुमची तक्रार [email protected] वर ई-मेलद्वारे पाठवू शकता. तुम्ही SBI कॉल सेंटरला 1800-425-9760 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

तुम्ही हैदराबाद येथे असलेल्या खालील पत्त्यावर पाठवू शकता-
स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्व्हे नंबर 21, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी समोर, मेन गेट, गचीबोवली, हैदराबाद-50001.

You might also like