आधार कार्डमधील फोटो खराब दिसत असेल तर अशा प्रकारे करा अपडेट

नवी दिल्ली । देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे. बँक खाते उघडण्यासाठी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, पासपोर्ट काढण्यासाठी असो की LPG सिलेंडरची सबसिडी घेण्यासाठी, जवळपास सर्वत्र आधार नंबरची मागणी केली जाते. म्हणूनच तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणे आणि ते तुमच्या मोबाइल फोन नंबरशी जोडणे महत्त्वाचे आहे.

आधार नंबर जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेळोवेळी आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना मोबाईल नंबरसह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगते.

आधार कार्ड बनवताना अनेक वेळा तुमचा फोटो निरुपयोगी ठरतो. काही वेळा आधार कार्डमधील फोटो ओळखणे देखील अवघड होते. जर तुमचा आधार कार्ड फोटो व्यवस्थित नसेल आणि तुम्हाला तो बदलायचा असेल तर तुम्ही हे काम अगदी सहजपणे करू शकाल.

आधार कार्ड मध्ये तुमचा फोटो कसा अपडेट करायचा ?
>> सर्व प्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आधार एनरोलमेंट/करेक्शन/अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्म काळजीपूर्वक भरा.
>> आता तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या आणि हा फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक डिटेल्स द्या.
>> फॉर्म घेतल्यानंतर, एक्झिक्युटिव्ह तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करेल आणि सिस्टीममध्ये अपडेट करेल.
>> डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला येथे 25 रुपये +जीएसटी शुल्क भरावे लागेल.