जर आपले बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आता WhatsApp वर बँकिंग सुविधेचा लाभ घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकट आणि लोकांच्या सोयी लक्षात घेता, सरकारी बँक ऑफ बडोदाने (Bank of baroda) आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे, ज्याद्वारे आपण घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बँकिंग करू शकता. आपल्याला यासाठी कोणतेही शुल्क देण्याची देखील आवश्यकता नाही. यासाठी आपल्याला फक्त आपल्या मोबाइलवर बँकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर बँकेच्या अनेक सुविधा मिळतील. आपण या सुविधेचा कसा फायदा घेऊ शकता हे जाणून घ्या.

बँक ऑफ बडोदाने ट्विट करून व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले आहे की,” BoB च्या व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगद्वारे आपण 24×7 बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकाल. तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट, चेक बुक रिक्वेस्ट, चेक बुक स्टेटस आणि इतर अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

कोणाला सुविधा मिळेल
बँकेची ही विशेष सुविधा केवळ अशाच लोकांना उपलब्ध असेल ज्यांचा मोबाइल नंबर बँकेत रिजस्टर्ड आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रिजस्टर्ड नसेल तर तुम्हाला या सुविधेचा फायदा घेण्यात अडचण येऊ शकते.

पहिले स्वत: ची नोंदणी करा
व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग करण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. आपल्याला आपल्या मोबाइलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बँकेचा बिझनेस अकाउंट नंबर 8433 888 777 सेव्ह करावा लागेल. यानंतर आपल्याला “Hi” लिहून या क्रमांकावर पाठवा आणि संभाषण सुरू करा. यावरील बोलण्याद्वारे असे समजले जाईल की, आपण व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या अटी आणि नियम तुम्हांला मान्य आहेत.

या बँकिंग सुविधा उपलब्ध असतील
>> ग्राहक त्यांचा अकाउंट बॅलन्स तपासू शकतात.
>> मिनी स्टेटमेंट पाहू शकतात.
>> चेकबुकसाठी रिक्वेस्ट करु शकतात.
>> चेकबुक स्टेटस तपासू शकतात.
>> याशिवाय शेवटच्या 3 व्यवहारांची माहिती उपलब्ध होईल.
>> क्रेडिट कार्डाची थकित रक्कम तपासू शकतात.
>> आपण क्रेडिट कार्डवर उपलब्ध क्रेडिट मर्यादा तपासू शकता.
>> डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक आणि ब्लॉक करू शकतात.
>> प्री अप्रूवड लोन ऑफरच्या डिटेल्स तपासू शकतात.

या बँका देखील देतात व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सुविधा
बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकदेखील व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सुविधा देत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना रिअल टाइम सुविधा मिळत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सुविधेसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment