Sunday, April 2, 2023

पीएम किसानचा 10 वा हप्ता मिळाला नसेल तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

- Advertisement -

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या भागातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशीही संपर्क साधू शकता.

येथे तक्रार करा

- Advertisement -

किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला नसेल, तर पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011 24300606 / 011 23381092 वर कॉल करू शकता.

पीएम किसान हेल्प डेस्क

याशिवाय सोमवार ते शुक्रवार पीएम किसान हेल्प डेस्कशी http://pmkisan ict@gov.in वर ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.

यामुळे अडकू शकतात हप्त्याचे पैसे

काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते.

केंद्र सरकार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. 6000 रुपयांची ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइनवर कॉल करून माहिती मिळवू शकता.