धाडस असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या : उदयनराजे भोसले यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापुरात खासदार संभाजी छत्रपती यांनी मोर्चा काढण्याचा इशारा आला आहे. त्या अनुषन्गाने आज साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे जाऊन खासदार संभाजी छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी खासदार भोसले यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली. “राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे घातक राजकारण केले जात आहे. सरकारमध्ये जर धाडस असेल तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं,” असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुणे येथे खासदार संभाजी छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा पार पडली. यावेळी पार पडलेल्या चर्चेनंतर दोन्ही राजेंनी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पाठींबा दर्शवला. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ” दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. आम्हाला कोणत्याही स्वरूपात आरक्षण हवं आहे. विशेष अधिवेशनही घ्यावं लागलं तरी चालेल. ते घ्यावं आणि कोणत्याही स्वरूपात मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी राज्यसरकारवर गंभीर टीका केली. या राज्यसरकारला मराठा समाजबांधवांना आरक्षण द्यावं लागणारच आहे. रंकेंद्राकडून आरक्षण मिळवण्याचं आम्ही बघू मात्र, राज्यातील आरक्षनाचा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवणे गरजेचं आहे. मात्र, या ठिकाणी राज्यकर्त्यांकडून मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचं घटक राजकारण केलं जात आहे, ते त्यांनी करू नये, असेही भोसले यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment