जर तुमच्याकडे बँक ऑफ इंडियाचे ‘हे’ खाते असेल तर तुम्हाला ₹ 1 कोटीचा लाभ फ्रीमध्ये मिळेल, फायदे कसे मिळवायचे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बँक ऑफ इंडिया (BOI) ने एक विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी प्लस अकाउंट योजना आणली आहे. सॅलरी प्लस अकाउंट योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत फ्री एअर एक्सिडेंटल बेनिफिट्स मिळू शकतात. बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

सॅलरी प्लस अकाउंट योजनेबद्दल जाणून घ्या …
बँक ऑफ इंडिया (BOI) च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बँक या योजनेअंतर्गत तीन प्रकारच्यासॅलरी अकाउंटची सुविधा देत आहे. ही योजना पॅरा मिलिटरी फोर्स, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी, विद्यापीठ, महाविद्यालय आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत 30 लाख रुपयांची ग्रुप पसर्नल डेथ इश्योरेंसची सुविधा दिली जात आहे. याशिवाय सॅलरी अकाउंट होल्डर्सना 1 कोटी रुपयांचा फ्री एअर एक्सिडेंटल बेनिफिट्स दिला जात आहे.

या खात्याचे इतर फायदे जाणून घ्या
BOI च्या या योजनेमध्ये ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.
या ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात शिल्लक नसले तरीही तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकाल.
रोख रक्कम काढण्याची मर्यादा रु .50,000/- पर्यंत आहे आणि फ्री प्लॅटिनम डेबिट कार्ड 1 लाख रुपयांच्या POS मर्यादेसह.
ग्राहकांना दरवर्षी 100 चेक लीव फ्री मिळतील. तसेच, डिमॅट खात्यांवर AMC शुल्क आकारले जाणार नाही.
होम लोन आणि कार लोनवर विशेष सवलत दिली जात आहे.
BOI सॅलरी अकाउंट होल्डर्सना गोल्ड इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड फ्री देत आहे.

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही सुविधा
खासगी क्षेत्रातील कर्मचारी बँक ऑफ इंडियाच्या स्लरी अकाउंटचा लाभ घेऊ शकतात. दरमहा 10,000 रुपये कमावणारे या योजनेअंतर्गत सॅलरी अकाउंट उघडू शकतात. किमान शिल्लक आवश्यकता नाही. सॅलरी अकाउंट होल्डर्सना 5 लाख रुपयांचे ग्रुप पसर्नल डेथ इश्योरेंस कव्हर मिळते. यामध्ये प्रत्येकाला फ्री ग्लोबल डेबिट कम ATM मिळते.

Leave a Comment