आरक्षण द्यायचं असेल तर पुनर्विचार याचिका दाखल करा : छत्रपती संभाजी यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशात केंद्र सरकारने आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यानंतर आता आरक्षणासाठी आग्रही असलेले भाजपचे खासदार संभाजी छत्रपती हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहले आहे. “आरक्षणाची ही लढाई राज्य सरकारने लवकर जिंकावी म्हणून केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पुनर्विचार याचिका दाखल करावी व मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळवून द्यावे,”अशी मागणी भाजचे खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटल आहे कि, ” न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतिम निकाल देताना 102व्या घटनादुरूस्तीमुळे राज्य शासनास आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचे मत नोंदविले आहे. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्याच पद्धतीने हा संपूर्ण विषय महाराष्ट्र शासनाशी व शासनाला असलेल्या अधिकारांशी थेट निगडीत आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी व अंतिमतः मराठा आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात अशी फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी.

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. कारण राज्य सरकारने पुन्हा मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून आता भाजकडून केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधें टीका केली जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत आता भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी मागणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आरक्षणप्रश्नी गरज पडल्यास आपण एक दिवसीय विशेष अधिवेशनही घेण्याचीही आमची तयारी आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल आहे.

Leave a Comment