जर तुम्हाला WhatsApp वरून बँक खाते काढून टाकायचे असेल तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्या पेमेंटसाठी गुगल प्ले, UPI, पेटीएमसह अनेक प्रकारचे पेमेंट गेटवे असले तरी आता सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचाही या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. आता प्रत्येकजण व्हॉट्सअअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस वापरू शकतो. जर तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस वापरत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.

जर तुम्ही WhatsApp पेमेंट्सवर एकापेक्षा जास्त बँक खाते वापरत असाल आणि त्यापैकी एक हटवू इच्छित असाल, तर ते WhatsApp च्या नवीन व्हर्जनवर देखील केले जाऊ शकते. हे फीचर Android आणि iOS दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहेत.

त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
पायरी 1: सर्वात आधी WhatsApp उघडा आणि ऍप्लिकेशन स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातअसलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
पायरी 2: आता, पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा. येथे बँक खात्यांची लिस्ट (जे जोडले गेले आहे) दिसेल.
पायरी 3: WhatsApp पेमेंटमध्ये एकाधिक बँक खाती असल्यास, हटवायचे बँक खाते निवडा.
पायरी 4: 3 डॉट्सवर टॅप करा, ‘Remove bank account’ ऑप्शनवर क्लिक करा.
पायरी 5: कंफर्मेशन नंतर, ‘Payment method successfully removed’ असा एक टेक्स्ट पॉप अप होईल.

हे फिचर कसे ऍक्टिव्हेट करावे?
यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईल अ‍ॅपवर येणाऱ्या नोटिफिकेशनवर जा. युझर्सना त्यांच्या ऍक्टिव्ह खात्याच्या डिटेल्सव्हे व्हॅरिफिकेशन UPI ला सपोर्ट करणाऱ्या भारतीय बँकेकडे करावे लागेल. यानंतर, पेमेंट अटी आणि प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावी लागेल. SMS द्वारे व्हेरिफाय करण्याची परवानगी द्यावी लागेल.

WhatsApp मध्ये खाते लिंक नसताना पैसे कसे मिळवायचे ?
>> Accept Payment वर क्लिक करा.
>> पेमेंट अटी आणि पॉलिसी पेज पर Accept आणि Continue वर टॅप करा.
>> SMS द्वारे Verify वर टॅप करा.
>> WhatsApp मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या सर्व बँक खात्यांची लिस्ट करेल.
>> जोडण्यासाठी खाते निवडा आणि Done वर क्लिक करा.

Leave a Comment