सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका – जुगार चालवणाऱ्या चाैघांच्या टोळीला सातारा जिह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईत टोळीप्रमुख यासीन इक्बाल शेख (वय- 38, रा. गुरुवार परज, गुरुकारपेठ, सातारा), टोळी सदस्य इनायत मोहम्मदअली शेख (वय 47, रा. 635 गुरुवार पेठ, सातारा), राजन अशोक सांडगे (वय 26, रा. 417 मंगळवार पेठ, सातारा) व जयसिंग हणमंत भोसले (कय 65, रा. 21 केसरकर पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
ही टोळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार चालवित होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून, अटक करून सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नक्हती. त्यांच्या उपद्रवामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी जनतेतून होत होती. त्यामुळे या 4 इसमांना हद्दपार करण्याबाबत हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांच्याकडे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी प्रस्ताव सादर केला होता.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या कतीने अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.