गोदावरी तून नियमबाह्य वाळू उत्खनन ;महसूल अधिकाऱ्यांची मिलीभगत उच्चस्तरीय चौकशी करा ! आ. बाबाजानी दुर्राणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या डाकु पिंप्री येथील गोदावरी नदी मधून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत पात्रात राजरोसपणे पोकलेन, यारी मशीनच्या साहाय्याने नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा केला जात असून याकडे स्थानिक महसूल विभागातील अधिकाऱ्यांपासून उपजिल्हाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून देत याप्रकरणी नियम भंगाची व आर्थिक नुकसान घोटाळ्याची राज्य स्तरावरील दक्षता पथकामार्फत प्रत्यक्ष तपासणी करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधान परिषद सदस्य आ .बाबाजानी दुर्राणी यांनी महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव यांना मेल द्वारे तक्रार करत मागणी केली आहे .

आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सोमवार 11 एप्रिल रोजी राज्याचे महसूल व वन विभाग प्रधान सचिव , विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे डाकू पिंप्री येथे नियमबाह्यपणे वाळू उत्खनन निर्दशनास आणुन देणारा ईमेल केला आहे. यात म्हटले आहे की, पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील वाळू गटाचा लिलाव झालेला आहे. वाळू लिलाव धारक हे जिल्हाधिकारी परभणी यांनी 1 फेब्रुवारी 2022 च्यां जा क्र . 2022 / महसूल / गौ . ख / प्र . क्र . 01 प्रमाणे नमूद केलेल्या अटी व शर्ती चे उल्लंघन करत शासनाच्या गौण खनिजाची लुट व आर्थिक नुकसान करत आहेत. लिलावधारकास या गौणखनिज घोटाळ्यात पाठीशी घालण्यासाठी स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तहसीलदार, उपजिल्हाधिकारी हे आर्थिक तडजोड करून संगणमत करीत आहेत त्यामुळे शासनाच्या नुकसाणीस कारणीभूत ठरत आहेत असा आरोप केला आहे.

या बाबींकडे वेधिले लक्ष ..
बाळू घाट लिलाव प्रकरणी जिल्हाधिकारी परभणी यांनी डाकु पिंपरि येथील बारा गट क्रमांकामधून ६४३१ ब्रास वाळू उत्खननाबाबत परवानगी दिलेली आहे , १.८२ हेक्टर क्षेत्रफळ मधून ५२० मीटर लांबी, ३५ मीटर रुंदी व एक मीटर खोली अशा परिमाण प्रमाणेच वाळू उत्खनन करणे बंधनकारक आहे. तसेच उत्खनन करण्यापूर्वी तालुका भुमिअभिलेख यांच्या कार्यालया मार्फत उत्खनन क्षेत्राचे सीमांकन निश्चित करून घेणे व त्या परवाना क्षेत्रात खांब ( स्तंभ ) उभारणे , त्या क्षेत्रात तार फेन्सिंग करून त्या आतीलच वाळू उत्खनन करणे बंधनकारक आहे तसेच ठेकेदाराचे नाव, पत्ता नमूद असलेला ठळक फलक त्या जागी लावणे नियमाप्रमाणे आहे. त्यांचे कुठेही पालन करण्यात आलेले नाही, कुठेही खांब, तार फेंसिंग नाही, सगळ्या नदीपात्रातून सर्रासपणे नियम भंग करीत उत्खनन करण्यात येत आहे. वाळू उत्खनन केवळ हातानेच करावी तसेच वाहनात भरण्यासाठी पोकलेन, जेसीबी सक्शन बोट किंवा इतर कोणत्याही यांत्रिक साधनांचा वापर करण्यात येऊ नये, तसेच कोणतेही मोठी वाहने नदीपात्रात नेता येणार नाहीत. केवळ ट्रॅक्टर , ट्रॉली द्वारे वाळू डेपो पर्यंत वाळू वाहतूक करून त्याचा मुख्य रस्त्यावर डेपो करावा असा नियम असतानाही सर्रासपणे नदीपात्रात मोठी मोठी वाहने , ट्रक्स , जेसीबी पोकलेन , लोडिंग ट्रक नदीपात्रात नेवून वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत आहे . वाळू गटात सीसीटीव्ही बसविणे व त्यांचे २४/७ असे सलग सीसीटीव्ही फुटेज छायाचित्रण करावे व त्याचा एड्रेस जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना देणे बंधनकारक आहे जर सीसीटीव्ही फुटेज खंडित किंवा बंद ठेवला किंवा केला असेल तर त्याबाबत दंड आकारण्यात यावा या बाबत जिल्हाधिकारी परभणी यांनी नियमा प्रमाणे अटी व शर्तीत नमूद केलेले आहे असे असतानाही कुठेही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत किंवा त्याचे सलग छायाचित्रण जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही.

वाळू उत्खनन करणे किंवा वाळू वाहतूक करणे यासाठी ” महा खनिज ” या संगणक प्रणाली प्रमाणे सर्व कार्यवाही प्रोसिजर करणे नियम नियमाप्रमाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वाहन वाहतूक करणान्या वाहना सोबत e – TP वाहतूक पास असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे परंतु स्थानिक महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासन अशा कोणत्याही e – TP पासची तपासणी करत नसल्याने डाकुपिंपरी येथील रेती / वाळू सरांसपणे लातुर , बिड व सोनपेठ तालुक्यात मोठया प्रमाणवर पास तयार करून वाळूचे उत्खनन वाहतूक व विक्री केली जात आहे. वरील सर्व नियमांचा भंग होत असताना स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकरी हे दुर्लक्ष तर करत आहेतच परंतु त्यांचे दुर्लक्ष ही संशयास्पद आहे .ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिलली आहे. या सर्व प्रकरणांची नियम भंगाची, व आर्थिक नुकसान घोटाळ्याची राज्यस्तरावरील दक्षता पथकामार्फत जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Leave a Comment