इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर खटला दाखल करा : काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.  राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल उपस्थित करत इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबार ला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तिला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही, मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांवर केलेल्या कारवाईचेही सचिन सावंत यांनी समर्थन केले आहे. डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

You might also like