नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले.

मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद एक गणपती बसविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील, नगरगध्यक्षा निलम येडगे,उपाध्यक्ष मनोहर शिंदे,बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विरोधी पक्षनेते अजित थोरात,नगरसेवक सागर जाधव, प्रशांत चांदे,भाजप शहराध्यक्ष सुरज शेवाळे,भाजप युवा मार्चाचे तानाजी देशमुख, गणेश चव्हाण,हणमंत शिंगण, मनसेचे दादासो शिंगण, जयंत कुराडे, मंडलाधिकारी पंडित पाटील, तलाठी सचिन निकम यांच्यासह भाजपा, मनसे, कॉग्रेस व रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डीवायएसपी सुरज गुरव म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव एक आदर्श निर्माण करणारा आहे. मात्र त्याचबरोबर कोरोना काळात आपल्या घरातील लोकांची काळजी घेणारा आहे. मलकापूर नागरिकांनी व गणेश मंडळांनी घेतलेल्या या निर्णयांचे मी स्वागत करतो तसेच सर्वाचे आभार मानतो. अशाप्रकारचे पाऊल सर्वांनीच टाकण्याची अपेक्षा आहे.

यावेळी गणपती विसर्जनास परवानगी नसल्याने नगरपरिषदेकडून घरागुती गणपती गोळा केले जाणार आहेत. प्रत्येक घरातून गोळा केलेल्या मूर्तीची विटबंना न होता विधीपूर्वक विसर्जन करावे, अशी मागणी दादासाहेब शिंगण यांनी केली.

सात गावात गणपती नाही – सुरज गुरव

कराड उपविभागीय क्षेत्रात ७ गावात गणपती बसविला जाणार नाही. तर १७० गावात एक गाव एक गणपतीचा निर्णय घेतला आहे. तसेच मलकापूर सारख्या शहरात चांगला निर्णय झाला असून कराड शहरही सकारात्मक पाऊल टाकत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment