अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

बीड : हॅलो महाराष्ट्र – गेवराई तालुक्यामधील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मृतदेहावर घातपाताचे व्रण होते. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली. हि हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली आहे.

या व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असे आहे. त्याचे वय ३२ वर्षे असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी होता. शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात संशयास्पद अवस्थेत ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या तर त्याच्या गळ्याभोवती फास लावल्याचे व्रण होते. या पोलिसांनी तातडीने पावले उचलत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. यानंतर हि हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. ज्ञानेश्वरच्या पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात जवळीक वाढत चालली होती. त्यांच्या अनैतिक संबंधात मृत ज्ञानेश्वरचा अडसर ठरत होता. त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारामध्ये टाकला. या प्रकरणी पोलिसांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

You might also like