LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, आजच पूर्ण करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हीही LIC पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. वास्तविक, पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. बाजार नियामक सेबीनेही असाच नियम बनवला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्यास सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे LIC लाही पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

जर तुम्ही अद्याप पॉलिसी पॅनशी लिंक केली नसेल तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन करू शकता. त्याच्या स्टेप्स जाणून घेऊयात…

1. LIC च्या साइटवर पॉलिसींच्या लिस्टसह पॅन डिटेल्स भरा.
2. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या मोबाईल नंबरवर LIC कडून एक OTP येईल, तो एंटर करा.
3. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टचा मेसेज मिळेल.
4. आता तुम्हाला कळेल की, तुमचा पॅन पॉलिसीशी लिंक केला गेला आहे.

घरबसल्या पॉलिसीचे स्टेट्स तपासा
>> LIC पॉलिसीचे ऑनलाइन स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला पहिले अधिकृत वेबसाइट  https://www.licindia.in/ वर जावे लागेल. येथील स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
>> रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्टेट्स कधीही तपासू शकाल.
>> तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 6827 6827 वर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <पॉलिसी नंबर> लिहून मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवल्यास तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

SMS द्वारे माहिती कशी मिळवावी ?
>> तुम्ही मोबाईलवरून SMS पाठवून पॉलिसीच्या स्टेट्सची देखील माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 56677 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.
>> तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही ASKLIC PREMIUM टाइप करून 56677 क्रमांकावर SMS पाठवू शकता.
>> पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL टाइप करून SMS करावा लागेल.

Leave a Comment