महत्वाची सूचना ! SBI इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सारख्या सुविधा उद्या बंद राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध केले आहे आणि त्यांच्या गरजेनुसार बँकेशी संबंधित कामे अगोदरच निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून उद्या बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.

SBI इंटरनेट बँकिंग सर्व्हिस शनिवार-रविवार रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे, तुम्ही 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी तुमची ऑनलाइन बँकिंग कामे पूर्ण करावीत.

बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे, “आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आहोत.” त्यात पुढे असेही म्हटले गेले आहे की, “आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 11.30 ते पहाटे 4:30 (300 मिनिटे) टेक्निकल अपग्रेडेशनचे काम करणार आहोत. INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI सह SBI च्या ऑनलाइन बँकिंग सर्व्हिस. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

SBI ची इंटरनेट बँकिंग सर्व्हिस 80 कोटींहून जास्त लोकं वापरतात आणि मोबाईल बँकिंग सुमारे 2 कोटी लोकं वापरतात. त्याच वेळी, YONO वर रजिस्टर्ड ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉग इन करतात. SBI चे देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आणि 57,889 पेक्षा जास्त ATM असलेले सर्वात मोठे नेटवर्क आहे.

Leave a Comment