2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात बँक देते इतके पैसे, ही नोट कुठे आणि कशी बदलायची ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । फाटलेल्या नोटांच्या बदल्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. आता या नियमांनुसार, नोटेच्या स्थितीनुसार, लोकांना आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये खराब झालेली किंवा फाटकी नोट बदली करून मिळू शकते. जर तुमच्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही या फाटलेल्या नोटा कुठून आणि कशा बदलू शकता आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला किती पैसे देईल याविषयी जाणून घेउयात…

फाटलेल्या नोटा इथे बदला
तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेला भेट देऊन या नोटा बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी तुमच्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना स्पष्टपणे निर्देशित केले आहे की,” फाटक्या नोटा बदलून द्या. यासह, त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेबद्दल बोर्डही लावावे लागतील.”

2000 च्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात इतके पैसे मिळवा
आरबीआयच्या नियमांनुसार, नोट किती फाटली गेली हे त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, जर 2000 रुपयांची नोट 88 चौरस सेंटीमीटर (cm) असेल तर पूर्ण पैसे उपलब्ध होतील, तर 44 चौरस सेमीला फक्त अर्धेच पैसे मिळतील.

बँका कोणतेही शुल्क आकारत नाहीत
फाटलेली नोट बदलण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. ही सेवा बँकेकडून मोफत दिली जात आहे. मात्र, अत्यंत वाईट किंवा खराब जळलेल्या नोटा बदलण्यास बँक नकार देऊ शकते. जर बँकेला शंका असेल की नोटा जाणूनबुजून खराब केल्या गेल्या असतील तर त्या बदलल्या जाणार नाहीत.

किती रिफंड मिळेल?
50, 100 आणि 500 ​​रुपयांच्या जुन्या फाटलेल्या नोटांच्या पूर्ण रिफंडसाठी, तुमची नोट 2 भागांमध्ये विभागली जाणे आवश्यक आहे, त्यापैकी एक भाग संपूर्ण नोटच्या 40 टक्के किंवा त्याहून अधिक क्षेत्र व्यापतो.

Leave a Comment