फुटबॉलच्या सामन्यात राडा ! प्रेक्षकांनी थेट खेळाडूंनाच केली मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पॅरीस : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे अनेक सामने हे प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आले. संपूर्ण ऑलिम्पिक प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवलं गेलं. पण मूळात प्रेक्षक नसल्याने सामन्यांना मजाच येत नाही. त्यासाठीच आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांचा खोटा आवाज देण्यात आला होता. जेणेकरुन टीव्हीवर सामना पाहताना अधिक रिएलस्टिक वाटेल. खेळाडूंमध्ये जोश कायम ठेवण्यासाठी आणि सामन्यांत खरी मजा, चुरस कायम ठेवण्यासाठी प्रेक्षक महत्वाची भूमिका पार पाडतात. पण जर हेच प्रेक्षक रागाच्या भरात मैदानात शिरुन खेळाडूंनाच मारहाण करु लागले तर काय होईल. यायचा प्रत्यय अशाच एका फुटबॉलच्या सामन्यात आला आहे.

फ्रान्सच्या लीग 1 मधील Nice vs Marseille यांच्या सामन्यादरम्यान Marseille संघाच्या खेळाडूंवर प्रेक्षकांनी हल्ला केला. यामध्ये दिमित्री पेयेट हा खेळाडू जखमी झाला आहे.ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा, Nice च्या संघाने 1-0 ची आघाडी घेतली होती. Marseille चा खेळाडू दिमित्री पेयेट कॉर्नर किक घेण्यासाठी गेला. त्यावेळी Nice च्या चाहत्यांनी त्याच्यावर बॉटल फेकून हल्ला केला. दिमित्रीने कॉर्नर न घेता तीच बॉटल पुन्हा प्रेक्षकांकडे फेकली. ज्यामुळे फॅन्सना खूप राग आला आणि ते थेट मैदानात उतरले आणि राडा घालायला सुरुवात केली आहे. बराच वेळ ही भांडण झाली सुरक्षारक्षक, खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या गर्दीने मैदानात भरुन गेलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

https://twitter.com/jpaterson97/status/1429540577402576901

मैदानातील राडा पाहून सामन्यातील पंचानी खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवले. Marseille च्या अध्यक्षांनी देखील या घटनेबाबत माहिती दिली. काही वेळानंतर Nice च्या खेळाडूंनी मैदानावर येत सामना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण Marseille संघाने यास नकार दिला. LIGUE 1 च्या नियमांनुसार एखादा संघ सामना खेळणार नसल्यास समोरच्या संघाला 3-0 ने विजयी घोषित केले जाते पण या ठिकाणी हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Leave a Comment