जावली | तालुक्यातील शेते येथे शेळी पालन फार्मच्या शेडात झोपलेल्या महिलेवर पतीच्या अल्पवयीन मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पिडीत महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेतील पिडीत महिला (वय- 22 वर्षे, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. शेते, ता. जावली जि. सातारा) येथील प्रकाश श्रीपती शिर्के यांच्या शेळी पालन फार्म च्या शेड मधील रूममध्ये दि. 30 सप्टेंबर रोजी तिच्या मुली सोबत झोपलेली होती. त्यावेळी पिडीत महिलेचा पतीचा मित्रही त्याच रूममध्ये झोपला होता. त्याने मध्यरात्री 1 ते 5 वाजण्याच्या दरम्यान जबरदस्ती शरीर संबंध केले. तसेच लैंगिक अत्याचार करून जीव मारून टाकण्याची धमकी दिली.
याबाबत पिडीताने तक्रार दाखल केलेली आहे. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालकास रिमांड होम सातारा येथे ताब्यात घेऊन दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बन्सल यांचे आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक सातारा अजित बोऱ्हाडे आणि उप विभागीय पोलीस अधिकारि वाई डॉ. शीतल जानवे -खराडे यांच्या मार्गदर्शन आणि सूचने प्रमाणे पुढील तपास प्रभारी अधिकारी मेढा पोलीस ठाणे अमोल माने हे करत आहेत.