कोरेगाव नगरपंचायतीत दुसऱ्यांदा आरक्षण सोडतीत इच्छुकांच्या दांड्या गुल

कोरेगाव | कोरेगाव नगर पंचायतीच्या आरक्षण सोडतीत दुसऱ्यांदा झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. मात्र, आता सोडतीत महिला आरक्षण पडल्याने साैभाग्यवतींना काम करण्याची संधी मिळणार आहे.

कोरेगाव पंचायत समिती सभागृहात सोमवारी आरक्षण सोडत पार पडली. यावेळी प्रांताधिकारी सौ. ज्योती पाटील, मुख्याधिकारी विजया घाडगे, मंडलाधिकारी ए. बी. पिसाळ, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

कोरेगाव नगपंचायतीसाठी प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

1 – अनुसूचित जाती महिला

2 – सर्वसाधारण

3 – सर्वसाधारण महिला

4 – इतर मागास प्रवर्ग महिला

5 – इतर मागास प्रवर्ग

6 – इतर मागास प्रवर्ग

7 –  सर्वसाधारण खुला

8 – सर्वसाधारण महिला

9 – सर्वसाधारण महिला

10 – सर्वसाधारण खुला

11 – सर्वसाधारण महिला

12 – अनुसूचित जाती

13 – सर्वसाधारण महिला

14 – सर्व साधारण

15 – सर्वसाधारण महिला

16 – सर्वसाधारण

17 – इतर मागास प्रवर्ग