एकतर्फी प्रेमातून तरुणाचे ‘हे’ धक्कादायक कृत्य; तरुणीचे आर्मीचे स्वप्न राहिले अर्धवट

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक कृत्य केले आहे. त्याने पीडित तरुणीच्या स्वप्नांची पार राखरांगोळी केली आहे. या तरुणीची दृष्टी गेल्यामुळे तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या दिवशी 4 तरुणांनी पीडित तरुणीला मारहाण करत तिच्या डोळ्यात चाकू घुपसला. यामुळे या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संपूर्ण घटनेला 2 महिने उलटून गेले. मात्र एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. एकीकडे हे आरोपी मोकाट आहेत तर पीडित तरुणीवर अजूनही उपचार सुरु आहेत. हि संपूर्ण घटना डेरा या गावामध्ये घडली आहे.

रनिंगदरम्यान झाला हल्ला…
हल्ला झालेल्या तरुणीचे नाव चंपा असे आहे. चंपा घटनेच्या दिवशी रनिंगसाठी गेली होती. यावेळी बगीच्यात काही तरुण आले आणि ते मला मारहाण करू लागले. पहिल्यांदा एका तरुणाने मला कानशिलात लगावली. त्यानंतर अन्य तरुण मारहाण करू लागले. त्यानंतर सुऱ्याने माझ्यावर हल्ला केला. सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दररोज 3 ते 4 किमी रनिंग करीत होते. त्या दिवशीही आईला एका ठिकाणी बसवून मी धावत होते असे चंपाने सांगितले.

तसेच चंपा 2017 मध्ये बीए पार्ट-1 ची परीक्षा देण्यासाठी गेली होती. यावेळी बबलू नावाच्या तरुणाने सांगितले कि जर तिने माझ्याशी लग्न केलं नाही तर तिला कोणासोबतच लग्न करण्यालायक ठेवणार नाही. तिला कधीही लग्न करायचं असेल तर ती माझ्यासोबतच करेल. मात्र चंपाने हि गोष्ट त्यावेळी गांभीर्याने घेतली नाही. यानंतर बबलूने रागाच्या भरात आपल्या मित्रांसह चंपावर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत मात्र त्यांचा अजून थांगपत्ता पोलिसांना लागला नाही.