पत्नीचा खून करून रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचोरा : हॅलो महाराष्ट्र – पाचोरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा अपघात झाल्याचा बनाव रचला. आरोपीने पतीने आपल्या पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन चाललो आहे, असे सांगत त्याने वाटेतच पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी पतीने अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला आहे.पण हा गुन्हा काही जास्त लपून राहिला नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मृत महिलेचे नाव अश्विनी मुकेश सोनवणे आहे. ती पाचोरा शहरातील राजीव गांधी नगर भागामध्ये राहत होती. मृत अश्विनीचे 14 मे 2019 रोजी पाचोरा येथील वाहनचालक मुकेश रमेश सोनवणे याच्याशी लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर आरोपींनी अश्विनीचा छळ सुरू केला होता. तसेच मुकेश हा नाशिकमधील एका मुलीशी आपलं प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगत अश्विनीला वारंवार त्रास देत होता. तसेच त्याने अश्विनीला चारचाकी घेण्यासाठी माहेरावरून 5 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारेन अशी धमकीदेखील दिली होती.

आरोपी पती मुकेश हा 23 मे रोजी रात्री सोयगाव याठिकाणी नातेवाईकांकडे अश्विनीला घेऊन जात असल्याचा बहाणा करत घराबाहेर पडला. या दरम्यान त्याने पाचोरा आणि शेंदुर्णी या दरम्यान त्याने अश्विनीचा खून केला. आणि चारचाकी वाहन उलटून अश्विनीचा मृत्यू झाल्याचे सगळयांना सांगितले. यानंतर पती मुकेश याने आपल्या पत्नीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. एकीकडे वाहन उलटून अश्विनीचा मृत्यू झाला असताना मुकेशला साधे खरचटलेसुद्धा नाही यामुळे मुकेशनेच अश्विनीचा खून केल्याचा संशय अश्विनीच्या नातेवाईकांना आला. यानंतर जावई मुकेश याने आपली मुलगी अश्विनी हिची हत्या केल्याची तक्रार अश्विनीची आई संगीता दीपक शेलार यांनी पाचोरा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अजून कोणालाच अटक करण्यात आली नाही आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment