व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती! मध्यरात्री तरुणाची कोयत्याने सपासप वार करत निर्घृण हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोयता गँगच्या दहशतीचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण, पुन्हा एकदा पुण्यात मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पाहिला मिळाला आहे. रविवारी मध्यरात्री पुण्यात एका तरुणाचा कोयत्याने हल्ला करत खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. फक्त किरकोळ वादातून संबंधित तरुणाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

किरकोळ कारणावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर सिद्धार्थ नंदकुमार हादगे या तरुणाची हत्या करण्यात आली. सिद्धार्थचे गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपींची किरकोळ कारणावरून वाद झाले होते. या वादाचा राग डोक्यात धरत आरोपींनी सिद्धार्थचा काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी सुरुवातीला तरुणाचा पाठलाग केला होता. यानंतर तो इमारतीच्या छतावर गेल्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ नंदकुमार हादगे याचे आरोपींची वाद झाले होते. त्यामुळे आरोपी कोयते घेऊन सिद्धार्थच्या मागावर होता. अखेर काल आरोपींनी त्याचा पाठलाग केला. तसेच त्याला एकट्यात घेरून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांचा ताब्यात घेतले आहे. मुख्य म्हणजे, पुण्यात पुन्हा एकदा अशी थरारक घटना घडल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने खून, दरोडेखोरी, महीला अत्याचार, हत्या प्रकरण अशा घटना घडत आहेत.