साताऱ्यात किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने वार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ कारणाच्या वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर कारंजे येथील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सदरच्या हल्ल्यामध्ये रोहित सोनटक्के हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारा युवक घटनेनंतर फरार झालेला होता. या घटनेची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झालेली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

युवकांवरील हल्ल्यानंतर दुचाकी गाडी (क्रमांक एमएच- 11- व्ही- 6732) रक्ताने माखलेली होती.  या घटनेनंतर मल्हारपेठ येथे तणावाचे वातावरण होते. तरूणांच्यातील किरकोल वादाचे पर्यावसन हाणामारीत व हल्यात झाल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच हल्लेखोरांना पकडण्यसाठी पोलिस अलर्ट झाले आहेत.